छोट्या व्यावसायिकाने इकोच्या आधारप्रणीत पेमेंट प्रणालीचा (Eko’s AePS) वापर करण्यासाठीची 8 कारणे

कुठल्याही किरकोळ व्यवसायात (Retail Business) सातत्याने टिकून राहणे खरोखरच आव्हानात्मक आहे, विशेषत: जेव्हा भारतातील बहुतांश शहरांमध्ये ऑनलाईन व्यवहाराचे प्रस्थ अधिकच जोम धरीत असतांना तर ते अधिकच जिकरिचे बनले आहे. ग्रामीण भागांत जेथे अद्यापपावेतो बँका पोहोचलेल्या नाहीत अशा भागांतील छोट्या व्यावसियाकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी छोट्या बँकिंग सेवांची उभारणी करून त्यायोगे त्यांचे उत्पन्न आणि एकंदरीत ग्राहकी यांत वाढ करण्यासाठी AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) अतिशय मोलाची मदत करु शकते. एकुण लोकसंख्येपैकी आधार कार्ड असलेली 98% लोकसंख्या आणि त्यांपैकी 30% लोकांनी आपापल्या बँक खात्याला संलग्न केलेली आधार कार्ड, या अशा परिस्थितीत आपल्या ग्राहकांना वापर करण्यास सोपे अशी डिजिटल पेमेंट पद्धत उपलब्ध करुन देणे म्हणजे आपल्या व्यवसायाचे मुल्यवर्धन करणेच होय. भारतीय राष्ट्रीय पेमेंट कार्पोरेशन (National Payment Corporation of India – NPCI‌) च्या मते, सद्ध्याच्या साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे आणि त्यापरत्वे लागू असलेल्या टाळेबंदीमुळे (Lockdown) ऑनलाइन रोख व्यवहारांत 40% वाढ झालेली असून येत्या काही महिन्यांमध्ये त्यातील वाढ 50% पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

आधारप्रणीत पेमेंट प्रणाली ही छोट्या व्यावसायिकांसाठी त्यांच्या वैध आधार कार्ड असणार्‍या आणि ते त्यांच्या बँक खात्याशी संलग्न असलेल्या नियमित ग्राहकांना बायोमेट्रिक साधन आणि AePS सेवेची नोंदणी करुन ATM सेवा पुरविण्याचा एक सुरक्षित पेमेंट पर्याय आहे.

सद्ध्याच्या या बदलत्या परिस्थितीत, अनेक लहान, मध्यम वा मोठे उद्योग हे डिजिटल पेमेंट करण्यावर लक्ष केंद्रीत करीत असतांना, छोट्या व्यावसायिकांसमोर त्यांचा उद्योग आणि उद्योग स्थाने कशी तग धरुन राह्तील हे एक मोठे आव्हान म्हणून उभे राहिले आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, अगदी शहरी भागांतील बहुतांश छोटे व्यावसायिक जसे की दुकानदार, औषधी विक्रेते, मोबाइल फोन रीचार्ज सुविधा असणारे, इलेक्ट्रिकल सामानांची विक्री करणारी दुकाने हे सर्व या घोंगावणा-या संकटाच्या भोव-यात सापडलेली आहेत. या उलट, ग्रामीण भागांतील जनता आजही ब-याच अंशी तिच्या दैनंदिन गरजांसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणा-या साधनांवरच अवलंबून आहे. आपण जर छोटे व्यावसायिक असाल तर आपण आपल्या ग्राहकांना Eko AePS (इकोची आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) सेवा उपलब्ध करुन देवु शकता आणि त्यायोगे आपले व्यवसायातील उत्पन्न आणि एकंदर ग्राहकी यांच्यात भरीव वाढ पाहु शकता. तुम्हाला जर Eko AePS (इकोची आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) सेवा याबद्दल काहीच माहिती नसेल तर, Eko AePS (इकोची आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) सेवा याबद्दलची थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे.

AePS काय आहे?

AePS किंवा आधारप्रणीत पेमेंट प्रणाली सेवा ही भारतीय राष्ट्रीय पेमेंट कार्पोरेशन (National Payment Corporation of India – NPCI‌) ने प्रस्तावित केलेली पेमेंट करण्याची पद्धत आहे ज्यायोगे संबंधित वापरकर्ता त्याचे डेबीट कार्डचा वापर करुन आधार कार्डच्या साह्याने रोखीचे आणि/किंवा बँकेचे व्यवहार करु शकतो. 

AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणालिचे) फायदे काय आहेत?

वैध आधार कार्ड आणि त्याच्याशी संलग्न केलेले बॅंक खाते असणारा कोणीही भारतीय रहिवाशी खालील प्रकारे AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणालिचा) फायदा घेवु शकतो.

 • आधार कार्डाचा वापर करून ते त्यांच्या खात्यात पैसे जमा करु शकतात किंवा काढू शकतात
 • डेबीट/क्रेडीट कार्डचा वापर न करता त्यांच्या खात्यातून पैसे पाठवु शकतात
 • बॅंक खाते असणार्‍या अन्य कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवु शकतात
 • त्यांच्या बॅंक खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकतात
 • ऑनलाईन खरेदी आणि विविध सेवांसाठिची बिले यांचे पेमेंट करण्यासाठी याचा वापर केला जावु शकतो

छोट्या व्यावसायिकांनी AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) सेवा सुरु करण्याचा विचार करणे का गरजेचे आहे?

AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) ही कोणत्याही अतिरिक्त गुंतवणुकीची आवश्यकता नसलेली, बायोमेट्रिक मशीन शिवाय - जिचा वापर सेवा प्रदांत्यांबरोबर जुळलेले राहाण्यासाठी केला जावु शकतो, पेमेंट करण्यासाठीची सर्वात सुलभ आणि सोपी अशी पद्धत असून या प्रणालीचा वापर करण्याचा व्यावसायिक विचार प्रत्येक छोटा व्यावसायिक नक्कीच करू शकतो. खाली दर्शविलेल्या व्यवसाय वाढीच्या तथ्याना विचारांत घेता छोट्या व्यावसायिकाने AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) सेवा कार्यान्वित करण्यास प्राधान्य का द्यावे हे स्पष्ट होते.

 • सुरक्षित आणि निर्धोक डिजिटल पेमेंट
 • बॅंकांदरम्यान व्यवहार करण्यासाठी वापर करता येतो
 • समाजातील ज्या घटकांपर्यंत बॅंका पोहोचल्या नाहीत त्यांच्या व्यवहारातील आर्थिक बाबींचा समावेश करून अशा समाजघटकांची सेवा करणे शक्य होते
 • कार्ड शिवाय रोख रक्कम प्राप्त करणे आनि बॅंक खात्यात रक्कम वळती करणे शक्य होते
 • अन्य विविध सेवांचे पेमेंट करणे शक्य होते
 • ग्रामीण भागांतील ग्राहक त्यांच्या जनधन खात्यात थेट लाभ हस्तांतरण अन्वये जमा झालेली रक्कम काढू शकतात

AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) कसे काम करते?

NPCI द्वारे मान्यताप्राप्त AePS सेवा प्रदात्याबरोबर नोंदणी झालेला AePS अभिकर्ता (एजंट) किंवा छोटा व्यावसायिक POS, आंतरजाल किंवा मोबाइल अ‍ॅप, बॅंकेने निर्गमित केलेला IIN (बॅंकेने दिलेल्या निर्गमित कर्त्याचा ओळख क्रमांक), आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक किंवा बोटांच्या ठशांचा वापर करुन व्यवहार करु शकतो.

छोट्या व्यावसायिकाने इकोच्या आधारप्रणीत पेमेंट प्रणालीचा (Eko’s AePS) वापर करण्यासाठीची 8 कारणे

तुम्ही जेव्हा Eko चे AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) चा सेवा प्रदाता म्हणून नोंदणी करता तेव्हा तुम्हाला मिळणारे काही प्रमुख लाभ खालील प्रमाणे आहेत.

 • AePS व्यवहारांतून मिळणारे आकर्षक कमिशन
 • प्रगत आणि सुरक्षित तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीरपणे पार पडणारे व्यवहार
 • तात्काळ पैसे पाठवणे
 • प्रमुख व्यवसाया व्यतिरिक्त तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या या मुल्यवर्धित सेवा सुविधेमुळे तुमच्याकडे वाढलेली ग्राहकांची वर्दळ.
 • अन्य डिजिटल पेमेंटची सेवा पुरविण्यासाठी ई-वॅलेट (e-wallet) चा वापर.
 • Eko ने प्रस्तावित केलेल्या ईंडो-नेपाळ आणि इतर डिजिटल पेमेंट सुविधांशी छोटा व्यावसायिक सहजपणे अद्ययावत होवु शकतो.
 • Eko च्या विस्तृत ऑनलाइन खरेदी (शॉपिंग) आणि विविध सेवांची पेमेंट्स या माध्यामातून करण्याची संधी.
 • Eko इंडिया द्वारे देवु केली जाणारी विविध कर्जे आनि आर्थिक सेवा यांचा लाभ प्राप्त करण्याची संधी.

Eko AePS सेवा प्रदाता म्हणून नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

Eko च्या आधारप्रणीत पेमेंट प्रणाली सेवांसाठी नोंदणी करणे अगदी सोपे आणि सुलभ आहे. एखादा छोटा व्यावसायिक AePS सेवा पुरविण्यास इच्छुक असेल तर, बहुतांश डिजिटल पेमेंट प्रणाली किंवा बॅंकांप्रमाणे, त्याला किंवा तिला काही आधारभूत माहिती द्यावी लागेल, जसे की

 • ईमेल आय डी (Email Id)
 • मोबाइल नंबर
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड (PAN Card)
 • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

इच्छुक छोटा व्यावसायिक Eko Connect वर जावुन आणि वरील आवश्यक माहिती पुरवून थेट नोंदणी करु शकतो. याप्रमाणे पुरवलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर छोटा व्यावसायिक त्याच्या बायोमेट्रिक साधणाची नोंदणी Eko Connect बरोबर करुन त्याच्या ग्राहकांना AePS सेवा देणे सुरु करु शकतो.

तर मग वाट कशाची पाहता? Eko च्या AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) सेवांसाठी नोंदणी करुन अधिकच्या कमाईसाठी आपले व्यवसाय क्षेत्र तयार ठेवा.....  लगेच Eko Connect डाऊनलोड करा आणि तुमच्या ग्राहकांना AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) सेवां उपलब्ध करुन द्या, त्यांना या सेवांचा लाभ देवुन आपणही लाभान्वित व्हा. आधिक माहितीसाठी कृपया 844844380 यावर संपर्क साधा किंवा https://eko.in/products/aadhaar-banking वर जावुन माहिती घ्या.