4 Eko AePS सेवा ज्या प्रत्येक छोटा व्यावसायिक आपल्या ग्राहकांना देऊ शकतो
#products #aeps
श्री. अभिनव सिन्हा आणि श्री. अभिषेक सिन्हा यांनी वर्ष 2006 मध्ये स्थापन केलेली इको इंडिया फायनान्शियल सर्विसेस प्रा. लि. भारतातील बँका नसलेल्या भागांत चोवीस तास बँक सेवा पुरविण्याचे उद्दीष्ट सुनिश्चित करते. भारतातील अनेक मोठ्या बँकांना त्यांच्या बँकिंग सेवा त्वरेने पुरविण्याकामी इको (Eko) त्यांच्याबरोबर भागीदारीत काम करते. AePS आणि तत्सम विविध सेवा प्रदान करण्यासाठी इको (Eko) बरोबरची भागीदारी छोट्या व्यावसायिकांना डिजिटल इंडियाचा एक भाग बनण्यास सक्षम करते.
आधार प्रणीत पेमेंट प्रणाली (AEPS) ग्राहकांना थेट बँकेत न जाता त्यांचे अत्यावश्यक बँकिंग आणि गैर-बँकिंग व्यवहार करण्याची मुभा देते. बँक नसलेले प्रभाग त्यांचे अत्यावश्यक असे बँकिंग व्यवहार AePS च्या माध्यमातून आपल्या जवळच्या छोट्या व्यावसायिकांकडून करून घेऊ शकतात. ग्राहक त्यांचे आधार कार्ड आणि बोटांच्या ठशाचा वापर करून बँकेत किंवा एटीएम (ATM) मध्ये न जाता व्यवहार करू शकतात.
शहरांप्रमाणे ग्रामीण भागांत बँका आणि एटीएम (ATM) घरांजवळ तसेच कार्यालयांजवळ नसतात, परिणामी ग्रामीण भागांतील ग्राहकांना बँक सेवांचा लाभ तितक्या सुलभतेने, सहजतेने आणि पाहिजे त्यावेळी घेता येत नाही. अशा भागांत, स्थानिक किरकोळ विक्रेते जसे की दुकानदार, औषधी विक्रेते किंवा मोबाईल रीचार्ज सेवा पुरविणारे छोटे व्यावसायिक इको (Eko) बरोबर भागीदारी करून मिनी बँकिंग सेवा प्रदान करू शकतात.
इको (Eko) ची AePS किरकोळ विक्रेते आणि छोट्या व्यावसायिकांना त्यांचे उद्योगाचे ठिकाण एटीएम (ATM) मध्ये रूपांतरीत करून त्यांच्या ग्राहकांना रोख रकमेचा भरणा, रोख रक्कम काढणे आणि खात्यावरील शिल्लक रकमेची चौकशी अशा मिनी बँकिंग सेवा प्रदान करण्यास मदत करते.
रोख रकमेचा भरणा §
इकोच्या (Eko) AePS सेवांच्या सहाय्याने छोटे व्यावसायिक आपल्या ग्राहकांना मिनी बँकिंग सेवा प्रदान करू शकतात. बँक सुविधांपासून वंचित असलेल्या ग्राहकांना EkoAePS चा वापर करून अधिकची औपचारिकता न करता रोख रकमेचा भरणा करणे शक्य होते. EkoAePS आधार प्रणीत सेवा आहे त्यामुळे ग्राहकांला रोख रकमेचा भरणा करण्यासाठी केवळ त्यांचा आधार कार्ड नंबर आणि बोटाचा ठसा द्यावा लागतो. बँक सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक अशा मूल्यवर्धित सेवा प्रदान करून आपल्या व्यवसायातील ग्राहकी वाढवू शकतात.
रोख रक्कम काढणे §
छोटे व्यावसायिक या सुविधेचा वापर करून इकोच्या AePS पर्यायाच्या माध्यमातून ग्राहकांना रोख रक्कम काढण्याची मुभा देवू शकतात. इको कनेक्ट (Eko Connect) द्वारे रोख रक्कम काढतांना पडताळणीसाठी ग्राहकाचे केवळ आधार कार्ड आणि बोटाचा ठसा यांचीच आवश्यकता असल्याने ही प्रक्रिया खूपच सोपी आहे.
पैशाचे हस्तांतरण §
छोटे व्यावसायिक आपल्या ग्राहकांना इको कनेक्ट (Eko Connect) चा वापर करून इकोच्या Send Cash या पर्यायाच्या साहाय्याने पैसे हस्तांतरण करण्यासाठी ही सुविधा वापरण्याची मुभा देऊ शकतात. AePS मधील अन्य सेवांप्रमाणेच, आधार कार्ड आणि बोटाचे ठसे यांच्या सहाय्याने खाजगी खात्यातील पैशाचे हस्तांतरण करण्याची मुभा देणारी ही एक अत्यंत सोपी आणि परिणामकारक पद्धत आहे.
शिल्लक रकमेची चौकशी §
छोटे व्यावसायिक AePS हा पर्याय निवडून ग्राहकांना त्यांच्या खात्यात उपलब्ध असलेल्या शिल्लक रकमेची पाहणी करण्यास देखील त्यांना मदत करू शकतात. तसेच ग्राहकांना त्यांच्या खात्यातील व्यवहारांचा आणि शिल्लक रोख रकमेचा मागोवा ठेवण्यासाठी त्या विशिष्ट तारखेचे मिनी स्टेटमेंट डाऊनलोड किंवा प्रिंट करून घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
मी (छोटा व्यावसायिक) लाभ कसा मिळवु शकतो? §
इको कनेक्ट (Eko Connect) बरोबर नोंदणी झालेले छोटे व्यावसायिक इको (Eko) च्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारातून भरीव कमिशनची कमाई करतात. तात्काळ कार्यान्वित होणारी सक्रियता आणि व्यवहाराच्या दिवशीच केली जाणारी व्यवहारपुर्ती या ठळक वैशिष्ट्यांमुळे इकोचे AePS छोट्या व्यावसायिकांसाठी नियमितपणे जास्तीचे ग्राहक आणि अधिकाची कमाई मिळविण्यासाठी एक असाधारण असा व्यावसायिक मार्ग आहे.
तसेच, ग्रामीण क्षेत्रातील बँक सुविधा नसलेल्या भागांत राहणार्या जनतेला डिजिटल तंत्रज्ञानाचा सुलभतेने विनादिक्कत वापर करण्यास समर्थ आणि सक्षम बनविणारे आमचे सर्व इकोचे भागीदार डिजिटल इंडिया या मोहिमेचा भाग बनतात. इकोच्या सहाय्याने छोटे व्यावसायिक शासनाच्या आर्थिक समावेशकता कार्यक्रम (Financial Inclusion Program) आणि प्रधानमंत्री जनधन योजना(PMJDY) जसे की एखाद्या योजने अंतर्गत लाभार्थ्याला पैसे पाठविणे, विमा, कर्ज, पेन्शन इत्यादी यांसारख्या सेवांसह अन्य हितकारक आर्थिक सेवांची व्याप्ती वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवते, यांसारख्या कार्यक्रमांत सहभागी होऊन शासनाला सक्रियपणे मदत करू शकतात.
छोटे व्यावसायिक आणि बँक सुविधा नसलेले लोक रोखीचे व्यवहार कसे करतात हे इकोने (Eko) परिणामकारकपणे दाखवून दिलेले आहे. इकोने (Eko) छोटे व्यावसायिक / किरकोळ विक्रेते यांना त्यांच्या व्यवसायातून अधिकची कमाई मिळविण्यासाठी सक्षम केले आहे. या मूलभूत बँकिंग सेवांव्यतिरिक्त, छोटे व्यावसायिक विद्युत बिल, पाणीपट्टी, इत्यादी सारख्या मासिक सेवा सुविधांचे शुल्क भरणा करण्यासाठी देखील इकोचा (Eko) वापर करू शकतात.
तर मग त्वरा करा आणि भारतातील सर्वाधिक विश्वासु आर्थिक सेवा प्रदाता बरोबर संलग्न होऊन डिजिटल इंडियाचा भाग बना. ईकोच्या AePS (Eko’s bAePS) च्या सहाय्याने अधिकची कमाई करण्यासाठी सज्ज व्हा. लगेच Eko Connect डाऊनलोड करा आणि तुमच्या ग्राहकांना AePS (आधारप्रणीत पेमेंट प्रणाली) सेवां उपलब्ध करुन द्या, त्यांना या सेवांचा लाभ देवुन आपणही लाभान्वित व्हा. आधिक माहितीसाठी कृपया 844844380 यावर संपर्क साधा किंवा https://eko.in/products/aadhaar-banking. वर जावुन माहिती घ्या.
All Posts